॥ योगिराज गजानन महाराज धुन ॥

ॐ नमो सद्गुरू । श्री गजानन बाबा ।
श्री गजानन बाबा । श्री गजानन बाबा ॥

दिगंबरा गजानना । यावे तू रक्षणा ॥

गुरू गजानन या हो । स्वामी मला भेट द्या हो ॥

मला गजानन छंद । जो करी नामजपात धुंद ॥

मुखे गजानन बोला । गण गण गणात बोते बोला ॥

स्वामींचा आमच्या घरी वास । षड्‌रिपुंचा होतो त्याने नाश ॥

माझा गजानन भोळा । स्मरता दर्शन वेळोवेळा ॥

गोपाळा गोपाळा । गजानन बाबा गोपाळा ।
साईबाबा गोपाळा । गजानन बाबा गोपाळा ॥